Wednesday, November 25, 2015

वस्त्र योजना

Amber Charkha, Spinning, Devotees, Uniforms, Hanks, Progress, Kolhapur, Shraddhavan
वस्त्र योजना : आता शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरतील बहुरंगी युनिफॉर्म्स

हरि ॐ. सद्‍गुरु बापूंनी ३ ऑक्टोबर २००२ रोजी १३ कलमी कार्यक्रमाच्या घोषणेच्या वेळी "वस्त्र योजना" हा अत्यंत महत्वाचा उपक्रम कार्यान्वित केला होता. बापूंनी ह्या "वस्त्र योजने"च्या निमित्ताने श्रद्धावानांच्या भक्ति आणि सेवा ह्या दोन मूलभूत अंगांना एकत्रितरित्या विकसित करणार्‍या "चरख्याची" सर्व श्रद्धावानांना नव्याने ओळख करून दिली. भारताच्या दुर्गम भागात वसलेल्या गरीब, कष्टकरी समाजातील विद्यार्थी वर्गाला आर्थिक अडचणींमुळे गणवेश विकत घेणे परवडत नाही व अशा भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अनियमित हजेरीमागचे हे एक प्रमुख कारण आहे ह्याची सद्‍गुरु बापूंनी आपल्या श्रद्धावान मित्रांना जाणीव करून दिली. अशा विद्यार्थ्यांच्या जीवनातील विकास खुंटित होऊन त्यांची प्रगती खंडित होते व एक जबाबदार भारतीय नागरिकाच्या भूमिकेतून अशा विद्यार्थ्यांना आधार देणे ही प्रत्येक श्रद्धावानाची नैतिक जबाबदारी आहे हे सांगून बापूंनी सर्व श्रद्धावानांना जागरूक केले. बापूंच्या सांगण्यानुसार आज अनेक श्रद्धावान आपल्या घरी हा चरखा अत्यंत प्रेमाने व भक्तिभावाने पवित्र मंत्राचे उच्चारण करत चालवितात आणि ह्या चरख्यातून निघणार्‍या सूतापासून संस्थेतर्फे गणवेश बनविले जातात.
Amber Charkha, Spinning, Devotees, Uniforms, Hanks, Progress, Kolhapur, Shraddhavan
        सध्या दरवर्षी कोल्हापुरनजिक पेंडाखळे गावात संस्थेतर्फे आयोजित केलेल्या वैद्यकीय व आरोग्य शिबीरात ह्या गणवेशांचे प्रामुख्याने विनामूल्य वितरण केले जाते. संस्थेतर्फे गेली १२ वर्षे सलग भरणार्‍या ह्या शिबीरामध्ये पेंडाखळे व आसपासच्या दुर्गम भागातील शाळांचा व शाळांतील विद्यार्थ्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांतर्फे सर्व्हे केला जातो व त्यानुसार हे गणवेश शिबीराच्या दिवशी वितरीत करण्यात येतात. २०१५ साली भरविण्यात आलेल्या शिबीरामध्ये एकूण ११३ शाळांतील ६२५४ विद्यार्थ्यांना (मुलं व मुली मिळून) प्रत्येकी २ ह्या प्रमाणात १२,५०८ गणवेशांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. "वस्त्र योजना" सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण साधारण २,२०,००० गणवेशांचे वाटप संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीपर्यंत शाळांच्या गरजेनुसार हे गणवेश संस्थेतर्फे बनविण्यात येत होते (उदा. मुलांसाठी पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट किंवा निळा शर्ट व निळी पॅन्ट). परंतु मला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की जिल्हा परिषदेच्या बदलत्या आवश्यकतेनुसार, पुढील काळात अशा शाळांतील विद्यार्थ्यांना बहुरंगी स्वरूपात (उदा. चेक्स पॅटर्न - खालील चित्रानुसार) गणवेश पुरविण्याचा संस्थेचा मानस आहे व त्या दिशेने संस्थेच्या सदस्यांचे अथक प्रयास चालू आहेत. २०१७ सालच्या वैद्यकीय व आरोग्य शिबीरात असे गणवेश देणे संस्थेला नक्की शक्य होईल.

या उपक्रमात सहभागी असलेल्या संस्थेच्या चरखा समितीच्या सर्व सदस्यांचे व त्याचप्रमाणे परमपूज्य बापूंच्या शिकवणीनुसार चरखा चालवणार्‍या सर्व श्रद्धावानांचे बापूंना खरोखरच कौतुक आहे आणि अशा या पवित्र परमेश्वरी कार्याकरिता सर्व श्रद्धावानांना हार्दिक शुभेच्छा.

                                    ॥  हरि ॐ  ॥     ॥  श्रीराम  ॥     ॥  अंबज्ञ  ॥

1 comment:

  1. हरी ॐ,

    आपल्या संस्थेतर्फे असलेल्या चरखा शिभीर तसेच कोल्हापुर मेडिकल कैंप हे दोन्ही मधे सहभागी होण्याची संधी बापूकृपेने मला लाभली. शहरात राहणारे आपण गावत कशी परिस्तिथि असते (अगदी आतल्या गावांमधे) ह्याची जराशी पण कल्पना आपल्याला नसते. पण आपण जो चरखा चालावा आणि त्याचा सूत वापरुन जो कपडा बनवला जातो त्याचा इतका सुरेख उपयोग पाहून मन भरुन येत. ती अनुभवलेली अंबज्ञता शब्दात मांडू शकत नाही.
    हरी ॐ | श्रीराम | अंबज्ञ

    ReplyDelete